बाळव्वा आर. कामरी या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळजवळ कृष्णा नदीत बुडून आत्महत्या केली असून तिचा मृतदेह सापडला आहे.
बागलकोट जिल्ह्यातील इलकल तालुक्याच्या छत्तीहाळ गावातील बाळव्वा आर. कामरी ही सरकारी मुलींच्या पदवीपूर्व महाविद्यालयात शिकत होती. दोन दिवसांपूर्वी तिने नदीत उडी मारली होती. अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. तिने आत्महत्या केल्याचे तिच्या पालकांनी सांगितले,’ असे मुद्देबिहाळजवळ पोलिस स्टेशनचे पीएसआय संजय टिपर्डी यांनी सांगितले.


Recent Comments