बेळगाव जिल्हा प्रशासन व महापालिकेच्या वतीने ‘स्वच्छता हीच सेवा’ ही विशेष चळवळ सुरू करण्यात आली.
०२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्ताने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता हीच सेवा , ही विशेष चळवळ उपक्रम बेळगाव जिल्हा प्रशासन व महापालिकेच्या सहकार्याने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते महानगरपालिकेच्या आवारात शुभारंभ करण्यात आला. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता ही सेवा विशेष चळवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

स्वच्छता हीच सेवा या विशेष चळवळीचे अधिकारी , यांच्यासह शेकडो विद्यार्थी, जिल्हाधिकारी , तालुका पंचायत सीईओ व महापौर नगरसेवक , यांनी उपस्थितांनी स्वच्छता हेच सेवा या विशेष चळवळीची शपथ घेतली.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, महापौर सविता कांबळे, महापालिकेचे नगरसेवक राजशेखर डोणी, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांच्यासह शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.


Recent Comments