Belagavi

कोकण रेल्वे भारतीय रेल्वेमध्ये विलीन करण्याचा विचार : मंत्री व्ही. सोमन्ना

Share

प्रवाशांना चांगली सेवा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याचा विचार करत असल्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही.सोमण्णा यांनी सांगितले.

महाराष्ट्रातून पुणे, मिरज, बेळगाव ते हुबळी मार्गे निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेस गाडीला बेळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वे राज्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यांनी . यावेळी खासदार जगदीश शेट्टर तसेच आजीमाजी आमदार यावेळी उपस्थित होते . भाजप कार्यकर्त्यांनी जय श्री राम, जय मोदीचा जयघोष करत आनंद साजरा केला.

मंत्री व्ही सोमन्ना म्हणाले की, कोकण रेल्वेचे जाळे केरळपासून महाराष्ट्रापर्यंत विस्तारले आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखी चांगली सेवा देण्यासाठी आम्ही ते भारतीय रेल्वेमध्ये विलीन करण्याचा विचार करत आहोत. या संदर्भात कर्नाटक, केरळ आणि गोवा सरकारशी बोलणी झाली असून महाराष्ट्राला पटवून दिल्यानंतर विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे ते म्हणाले.

खासदार जगदीश शेट्टर म्हणाले की, बेळगाव ते बंगळुरू दरम्यान वंदे भारत ट्रेन आणण्याची जबाबदारीही माझी आहे, सवदत्ती येथे रेल्वेच्या कामासाठी मी कार्यवाही करीन आणि पंढरपूर ते बंगळुरू दरम्यान दररोज ट्रेन धावणार आहे.

मंत्री व्ही.सोमन्ना, खासदार जगदीश शेट्टर, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी , महापौर सविता कांबळे, माजी खासदार मंगला अंगडी उपस्थित होते.

Tags: