मानवी जीवनात संस्काराला खूप महत्त्व आहे. पती-पत्नी मुलांसमोर भांडले तर मुलांचे संस्कार बिघडतात. त्यामुळे पालकांनी मुलांना चांगले संस्कार द्यावेत, असे मत मदरखंडीचे प्रवचनकार श्री निजगुणदेव महास्वामीजी यांनी व्यक्त केले.

विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील लच्यान गावात २४ आणि २५ सप्टेंबर रोजी सद्गुरू श्री सिद्धलिंग महाराज यांच्या ९७ व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या पार्श्वभूमीवर रविवारी अजात नागलिंग अज्जन्नावर पुराण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात बोलताना श्री निजगुणदेव महास्वामीजी म्हणाले, नागलिंग अज्जन्नावर यांना आपल्या आईबद्दल खूप आदर होता. पुढे संन्यासी बनलेल्या नागलिंग अज्जन्नावर यांनी आपल्या भक्तांना योग्य मार्ग दाखविला. जिजाऊंनी दाखविलेल्या मार्गावर चालणारे छत्रपती शिवाजी महाराज, आई – वडिलांच्या सेवेत गुंतलेला भक्त पुंडलिक, यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपल्या आई – वडिलांची देवाच्या स्वरूपात पूजा करा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सेवानिवृत्त शिक्षक विठ्ठल कराळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात रुद्राप्पा हुगार यांनी आईचा महिमा सांगणारे गीत सादर केले. यावेळी निरंजन रुईकर यांनी तबला साथ दिली. पुराण कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या पुराण कार्यक्रमात सेवानिवृत्त प्राचार्य ए.पी. कागवाड, पडणूर गावातील सिद्धू पुजारी, इंडी येथील रुगी कुटुंबातील संजीव कुमार आदींच्यावतीने प्रसादाची सोय करण्यात आली होती.
यावेळी निवृत्त प्राचार्य ए.पी. कागवाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.एस. पाटील, एम.एस. मुजगोंड, संकापगौडा बिरादार, हणमंत मुजगोंड, जगदीश बाबुलगाव, व्ही. सी. बिरादार, श्रीशैल संभाजी, शिवनिंगप्पा सिद्रामशेट्टी, सुधाकर बिरादार, संजीव अंकलगी, मंजुनाथ निंबरगी, हणमंत निंबरगी, कुंभार, गुरुपाद बाबुलगी आदी उपस्थित होते. हणमंत कागवाड यांनी स्वागत तर शिवयोगी बिरादरा यांनी आभार मानले.


Recent Comments