बेळगाव येथील बसव प्रेमी शंकर गुडस यांना बसव समितीतर्फे बसव भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. बी.डी. जत्ती यांच्या ११२ व्या जयंती आणि बेलीमठचे श्री शिवरुद्रस्वामीजी यांच्या दिव्य उपस्थितीत आज बंगळुरू येथील अनुभव मंटप सभागृहात आयोजित बसव समितीच्या वज्र महोत्सव सोहळ्याचे उद्घाटन विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे अध्यक्ष यू.टी. खादर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बसवासमितीचे अध्यक्ष अरविंद जत्ती होते.

समारंभात बेळगाव येथील बसवप्रेमी शंकर गुडस यांना बसव समितीतर्फे बसव भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments