Belagavi

विविध ठिकाणी झालेल्या चोरीप्रकरणातील आरोपींना अटक : मार्केट पोलिसांची कारवाई

Share

बेळगाव मार्केट पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी तीन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून दोन आरोपींना अटक करून लाखो रुपयांचे सोने व रोख रक्कम जप्त केली.

बेळगाव मार्केट पोलिस ठाण्याचे निरीक्षक महांतेश धामण्णावर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चोरीच्या तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास करून दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 6 लाख 48 हजार रुपये किमतीचे सोने जप्त केले आहे. मार्केट पोलीस स्थानक, माळमारुती पोलीस स्थानक आणि मारिहाळ पोलीस स्थानक या हद्दीत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलिसांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: