कुलकर्णी गल्ली, बेळगाव येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवाच्या 8 व्या दिवशी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
बेळगावात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणेशोत्सवादरम्यान विविध धार्मिक, सामाजिक आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच अनुषंगाने बेळगाव शहरातील कुलकर्णी गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी श्री सत्यनारायण पूजा, गणहोम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कुलकर्णी गल्लीसह परिसरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शवून महाप्रसादाचा लाभ घेतला.


Recent Comments