Belagavi

हिंदी भाषा सक्तीविरोधात बेळगावात आंदोलन

Share

14 सप्टेंबर रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या केंद्र सरकारच्या हिंदी सप्ताहाविरोधात आज बेळगावात कर्नाटक संरक्षण मंचातर्फे आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारच्या हिंदी सप्ताहाविरोधात गोगटे सर्कल येथे कर्नाटक संरक्षण मंच तर्फे आंदोलन करण्यात आले. करवे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

केंद्र सरकार दरवर्षी 14 सप्टेंबरला हिंदी सप्ताह साजरा करत आहे. प्रादेशिक राज्यांवर हिंदीची सक्ती करण्यात येत असून याचा कर्नाटक संरक्षण मंचाने निषेध केला आहे. केंद्राच्या या भूमिकेविरोधात कर्नाटकाच्या खासदारांनी आवाज उठवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दीपक गुडगेनट्टी यांनी दिला.

शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेली इतर भाषेतील भित्तीपत्रके फाडणाऱ्या करवेच्या कार्यकर्त्यांना डीसीपी रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली ताब्यात घेण्यात आले.

यादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या आंदोलनात शेकडो करावे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: