Belagavi

बेळगावच्या राजासमोर घुमली मंगळागौर

Share

चव्हाट गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात विविध धार्मिक – सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून या अंतर्गत पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांचे सादरीकरण करण्यात आले.

पारंपरिक वेशभूषेत, मंगळागौरीचे खेळ चव्हाट गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात सादर करण्यात आले. या गणेशोत्सव मंडळाच्यावतीने दरवर्षी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच अनुषंगाने यंदा मंगळागौरीचे पारंपरिक खेळ सादर करण्यात आले.

वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट यासारखे अनेक खेळ मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यांसह सादर करून लक्ष वेधण्यात आले.

Tags: