बेळगाव बार असोसिएशनतर्फे ॲडव्होकेट्स फुटबॉल लीग 2024 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी वकिलांसह फुटबॉल खेळून फुटबॉल लीगचा शुभारंभ केला.
बेळगाव बार असोसिएशन, बेळगावीतर्फे शनिवारी ॲडव्होकेट्स फुटबॉल लीग 2024 चे आयोजन करण्यात आले होते. बार असोसिएशनचे अध्यक्ष एस.एस. किवडसन्नावर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग उपस्थित होते. शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग यांनी वकिलासोबत फुटबॉल खेळला, हे विशेष होते .
मुख्य व जिल्हा सत्र न्यायाधीश त्यागराज एन. इनवल्ली म्हणाले कि , न्यायालयात वकिली करतात तेव्हाच सर्व वकील वादी आणि प्रतिवादी असतात. पण कोर्टाबाहेर सगळे वकील मित्र असतात. माणसाने एकाच वातावरणात न राहता नेहमी वेगवेगळे छंद, खेळ आणि मनोरंजन यात गुंतले पाहिजे. मन, बुद्धी आणि शरीर सुव्यवस्थित असेल तरच चांगल्या गोष्टी करता येतात आणि त्यासाठी प्रत्येकामध्ये खिलाडूवृत्ती असायला हवी, असे ते म्हणाले.

यावेळी प्रथमच क्रिकेट व्हॉलीबॉल आणि फुटबॉल राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याला सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला. असे वकील संघटनेचे अध्यक्ष एस.एस. किवडसन्नवर म्हणाले. नंतर वकिलांच्या वेगवेगळ्या संघांमध्ये फुटबॉल स्पर्धा सुरू झाली.
यावेळी बी.आय.गंगई. टी.सी. मोदगी, डी.एम. पाटील, एस.सी. जैन, आय.एम. पाटील, एम.एस. बगली, व्ही.एस.भस्मे, बसवराज मुगली, वाय.के.दिवटे, विजय पाटील, शीतल रामशेट्टी, विश्वनाथ सुलतानपुरी, सुमितकुमार अगसगी, इरण्णा पुजेर, विनय मांगलेकर आदींचा सहभाग होता.


Recent Comments