Belagavi

मराठा समाजाच्या स्वामीजींनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी दिली भेट

Share

कर्नाटक राज्यातील मराठा समाजाचे जगद्गुरू गविपुरम गोसाई संस्थान श्री भवानी दत्त पीठाचे श्री मंजुनाथ भारती स्वामीजी यांनी मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांच्या बेळगाव येथील निवासस्थानी भेट दिली.

विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी स्वामीजींचे स्वागत व सन्मान केला. यावेळी स्वामीजींनी मराठा समाजाची स्थिती, मराठा संस्कृती, मराठा समाजाच्या शैक्षणिक सुविधांसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच स्वामीजींनी मराठा धर्म जागृतीसाठी केलेले कार्य, समाजप्रबोधन व भविष्यात करावयाच्या कार्याची माहिती दिली.

बाळू देसुरकर, उमेश पाटील, युवराज कदम, सातेरी कोकितकर, प्रल्हाद चिरमुरकर आदी होते.

Tags: