Belagavi

पत्रावळी-द्रोण पासून साकारली पर्यावरण पूरक बाप्पाची लक्षवेधी आरास

Share

गणेशोत्सवात गणेशाची आरास करताना विविध साहित्यांचा वापर करून नयनरम्य असा देखावा साकारला जातो. बऱ्याच वेळा थर्माकोल व प्लास्टिक वस्तूंचा वापर करून देखावे साकारले जातात मात्र बेळगावमधील कलखांब येथील राधिका संतोष कोलकार यांनी गणेशोत्सवा निमित्त पानांच्या पत्रावळी व द्रोण यापासून घरी साकारलेली नयनरम्य पर्यावरण पूरक आरास सर्वांनाच भुरळ पाडत आहे.

बेळगावमधील कलखांब येथील राधिका संतोष कोलकार यांनी घरगुती गणेश मूर्ती सजावटीसाठी पानांची पत्रावळी व द्रोण यांपासून पर्यावरण पूरक अशी आरास साकारली आहे. नाविन्यपूर्ण कौशल्याने घरबसल्या उपलब्ध साहित्यातून कमी खर्चात सुंदर मंडप बनवता येतो, शिवाय पत्रावळी व द्रोण यांपासून एवढी आकर्षक आरास साकारता येते हे सदर आरास पाहिल्यावर लक्षात येते. गणेशोत्सवात केले जाणारे देखावे थर्माकोल, तसेच प्लास्टिक या सामग्रीचा वापर करून तयार करतात. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहचते. . मात्र पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी गणेशोत्सवात पर्यावरण पूरक देखावे सादर करणे ही काळाची गरज आहे हाच संदेश या कुटुंबाने दिला आहे.

Tags: