Belagavi

बेळगावात फटाक्यांचा स्फोट : १२ वर्षीय बालक जखमी

Share

फटाके फोडताना फटक्याला लागलेली आग लक्षात न आल्याने फटाक्यांचा स्फोट होऊन १२ वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना बेळगावमध्ये घडली आहे.

रामनगर, बेळगावमधील हनुमंत गाडीवड्डर (वय १२) या मुलाने फटाके फोडण्यासाठी उदबत्ती लावली. मात्र फटाक्याला आग लागली कि नाही हे पाहण्यासाठी जाऊन, अंदाज न आल्याने पेटलेले फटाके खिशात ठेवल्याने फटाक्यांचा स्फोट झाला. यामध्ये सदर मुलगा जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, हि घटना माळमारुती पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत घडली आहे.

सध्या गणेशोत्सवाची धामधूम सर्वत्र सुरु असून बच्चे कंपनी फटाके फोडण्याचा आनंद लुटण्यात व्यस्त आहेत. मात्र अशावेळी प्रत्येकाचे खबरदारी बाळगून फटाके फोडण्याचा आनंद लुटणे गरजेचे आहे.

Tags: