Belagavi

कंग्राळी बुद्रुक येथे गणेशोत्सवाचा रौप्यमहोत्सव

Share

बेळगावच्या कंग्राळी बुद्रुक येथील संगम नगर येथील श्री गणेशोत्सव मंडळाचा रौप्यमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

श्री गणेशोत्सव मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आज श्री सत्यनारायण महापूजा, होम, महाप्रसाद आणि विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी उपस्थिती दर्शवून महाप्रसादाचा लाभ घेतला.

Tags: