Belagavi

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सत्तेवरून हटवण्याचा कट : मंत्री मधु बंगारप्पा

Share

प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा म्हणाले की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना सत्तेवरून हटवण्याचा कट रचला जात आहे .

बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री मधु बंगारप्पा म्हणाले कि , सिद्धरामय्या यांना कोणीही खाली आणू शकत नाही.मुख्यमंत्रीपदी ते कायम राहावेत अशी आमची इच्छा आहे . , अरविंद क्रेजवाल आणि ममता बॅनर्जी यांचे प्रकरण न्यायालयात आहे.त्यांना सिद्धरामय्या एवढेच का दिसतात ? असा प्रश्न मधु बंगारप्पा यांनी केला .

आमचे वडील मुख्यमंत्री असताना आम्ही पुरेशी प्रकरणे पाहिली आहेत, यावर चर्चा करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. भल्याभल्यांना खाली उतरवण्याच्या युक्त्या विरोधी पक्षांकडे आहेत, भाजप हे आजपर्यंत स्वबळावर सत्तेत आलेले नाहीत.

दिवाळीनंतर सरकार पडेल या भाजप नेत्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले कि , भाजपला आणखी चार दिवाळीची वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत घरी दिवाळी साजरी करायला सांगा.

Tags: