रुग्णालयात आपला जीव वाचविण्यासाठी प्रत्येकजण धाव घेतो. मात्र रुग्णालयातील डॉक्टरच जर दारूच्या नशेत धिंगाणा घालताना दिसून आले तर मात्र नागरिकांच्या जीवाची हमी मिळणे कठीण आहे. विजयपूर मधील सरकारी रुग्णालयात एका मद्यपी डॉक्टरने धिंगाणा घातला असून डॉक्टरच्या या कृत्यामुळे नागरीकातून संताप व्यक्त होत आहे.
विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील शिरनाळ येथील सरकारी आयुष केंद्रात एक डॉक्टर दारूच्या नशेत आला. नारायण राठोड असे या डॉक्टरांचे नाव असून मद्यधुंद अवस्थेत आलेल्या डॉक्टरने चक्क रुग्णालयातील फर्निचरचा चक्काचूर केला. रुग्णालयाबाहेर येऊन याने खिडकीची काच फोडली. मद्यधुंद अवस्थेत रुग्णालयातच पडलेल्या डॉक्टरची अवस्था पाहून महिला रुग्णांनी संताप व्यक्त केला. एकंदर प्रकाराबाबत संतप्त नागरिकांनी सदर डॉक्टरला निलंबित करण्याची मागणी केली आहे.


Recent Comments