Belagavi

नूतनीकरण केलेल्या अंजुमन पदवीपूर्व कॉलेजच्या इमारतीचे मा. आ . फिरोज सेठ यांनी केले उद्घाटन

Share

अंजुमन शैक्षणिक संस्थेने नेहमीच चांगले शिक्षण दिले आहे आणि सामाजिक कार्य केले आहे.असे माजी आमदार फिरोज सेठ म्हणाले  माजी आमदार फिरोज सेठ यांच्या हस्ते आज बेळगाव येथील अंजुमन पदवीपूर्व कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या खोल्यांचे उद्घाटन करण्यात आले.

माजी आमदार फिरोज सेठ म्हणाले की, अंजुमन संस्था गेली अनेक वर्षे सामाजिक कार्यासाठी ओळखली जाते, आमचे वडील नूर अहमद सेठ यांनी बेळगावमध्ये अनेक कामे केली आहेत, त्या संदर्भात आज नवीन खोल्यांचे उद्घाटन करण्यात आले. मुफ्ती मंजूर आलम म्हणाले की, पूर्वी राजे तलवारीने लढून जिंकत असत, पण आज लेखणीने संपूर्ण जग बदलले जाऊ शकते, शिक्षणानेच गरिबी हटवता येते. चांगले शिक्षण घेतल्यास तुम्हालाच नाही तर तुमच्या कुटुंबालाही उच्च पद मिळेल, असे ते म्हणाले.

आमदार राजू सेठ म्हणाले की, अंजुमन पदवीपूर्व कॉलेजमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, संस्थेला ग्रंथालय, संगणक, विज्ञान प्रयोगशाळा देण्यात आली आहे. पूर्वी अंजुमन कॉलेजच्या शिक्षकांना सांगितल्याप्रमाणे आज सर्व काही उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. अंजुमन कला, वाणिज्य आणि विज्ञान व्यतिरिक्त अनेक अभ्यासक्रम प्रदान करते.

यावेळी आमदार राजू सेठ, माजी आमदार फिरोज सेठ, एम.एम.कांबळे, डॉ. झियाउद्दीन हाफीज, अल-हज जनाब समीउल्ला, प्राचार्य एम.के.नदाफ , शबाना बिरादार , शाहीन ताज शेख उपस्थित होते.

Tags: