राज्यात अधून-मधून मुख्यमंत्री बदलाबाबत चर्चा सुरु असून मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असण्याची इच्छा व्यक्त करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर. व्ही. देशपांडे यांनी आता आपल्या वक्तव्यापासून युटर्न घेतला आहे.
पुढील पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी सिध्दरामय्याच असतील अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आर. व्ही. देशपांडे यांनी आपल्या वक्तव्यापासून युटर्न घेतला आहे. मीही मुख्यमंत्री होणार असल्याची इच्छा व्यक्त केली मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदी कायम राहतील, असे ते म्हणाले. बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले कि आपण अजूनही मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहे. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या राज्यात चांगले काम करत असून पुढील काळातही तेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हेदेखील मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. सरकार सुरळीतपणे चालले आहे असेही ते म्हणाले.
वंदे भारत रेल्वे बेळगावात आली पाहिजे, उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांचाही विकास झाला पाहिजे, केंद्रीय मंत्री व्ही सोमन्ना, प्रल्हाद जोशी यांनी राजकारण न करता राज्यात अधिकाधिक सुविधा आणाव्यात, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.


Recent Comments