Belagavi

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी रिक्षा उलटली : विद्यार्थी किरकोळ जखमी

Share

शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या ऑटोवरील चालकाचा ताबा सुटल्याने ती उलटून ,विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची घटना नेहरूनगर येथे घडली आहे . रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे .

शहरातील , नेहरू नगर ते एपीएमसी या रस्त्यावर सहाहून अधिक शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या ऑटोवरील चालकाचा ताबा सुटून ती उलटली, त्यात मुले किरकोळ जखमी झाली . 10 हून अधिक शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या ऑटोवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि एपीएमसी रस्त्यावरून आंबेडकर नगरच्या दिशेने दुभाजकाला धडक दिली. रिक्षा उलटल्याने , समोरची काच फुटून 500 मीटरवर जाऊन पडली . ऑटोमधील मुले खाली पडून किरकोळ त्यांना दुखापत झाली. यावेळी जमलेल्या लोकांनी ऑटोचालकाला चांगलेच धारेवर धरले .


ऑटोचालक नशेत होता . अपघातानंतर शाळकरी मुलांना घेऊन निघून गेला. यामुळे सुमारे 20 मिनिटे वाहतूक कोंडी झाली होती. ही घटना उत्तर वाहतूक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

शहर पोलिस आयुक्त वाहतूक पोलिसांकडून , हेल्मेट न घालणाऱ्यांविरुद्ध दंड वसूल करण्यात व्यस्त आहेत. मात्र रिक्षात लहान मुलांना कोंबून नेणाऱ्या ऑटोचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी जनतेने केली आहे.

Tags: