गदग शहरातील दाट लोकवस्तीत बेकायदेशीररीत्या साठवून ठेवलेले लाखो रुपयांचे फटाके जप्त करण्यात आले आहेत.
गदग शहरातील दासर ओणी येथील लोकवस्तीत साठवून ठेवलेले फटाके जप्त करण्यात आले आहेत. रामचंद्र सिद्धलिंग यांच्या घरात बेकायदेशीरपणे फटाके ठेवण्यात आले होते. गदग शहर ठाण्याचे सीपीआय डी.बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हि कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी हि कारवाई केली असून कार्रवाईदरम्यान पोलिसांनी फटाके साठवून ठेवलेल्या ठिकाणाची झडती घेतली आणि लाखो रुपयांचे फटाके जप्त केले. हे प्रकरण गदग शहर पोलीस स्थानकांतर्गत दाखल करण्यात आले आहे.


Recent Comments