Belagavi

चिंचोक्यांपासून साकारली गणेशमूर्ती!

Share

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याच्या सरकारच्या आदेशानुसार बेळगावातील एका गणेशमूर्तीकाराने पर्यावरणपूरक अशी भव्य गणेशमूर्ती साकारली आहे.

दोन्ही हातात पाशांकुश, एका हातात अभय आणि दुसऱ्या हातात मोदक असा चतुर्भुज श्री गणेश चक्क चिंचोक्यापासून साकारला आहे.. मूर्तिकार सुनील आनंदाचे यांनी.. त्यांनी साकारलेली हि कलाकृती लक्षवेधी ठरत असून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती असल्याचे याची विशेष दखल घेतली जात आहे.

बेळगावच्या जुन्या गांधीनगर येथील मूर्तिकार सुनील आनंदाचे हे अनेक वर्षांपासून गणेशमूर्ती बनवत आहेत. पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे आकर्षण कमी असते असे म्हटले जाते मात्र याला अपवाद ठरवत चक्क चिंचोक्यांपासून मूर्ती बनवून अनेकांचे लक्ष त्यांनी वेधले आहे. सुनील आनंदाचे हे पर्यावरणपूरक श्रीगणेश मूर्ती बनविण्यासाठी प्रसिद्ध असून त्यांनी मागील वर्षी रुद्राक्षापासून गणेश मूर्ती साकारली होती. यंदा चिंचोक्यांपासून बनविण्यात आलेल्या श्रीमूर्तीसाठी सुमारे 20 दिवस अथक परिश्रम करून 2 लाख 21 हजार 111 चिंचोक्यांचा वापर करण्यात आला आहे.

सदर श्री गणेश मूर्ती हि बेळगावमधील माळीगल्लीच्या सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळाने बनविण्यास सांगितली असून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करणारे मूर्तिकार सुनिल आनंदाचे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags: