Belagavi

मुद्रा योजने अंतर्गत कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक : आरोपी महिला फरार

Share

मुद्रा योजनेतून सरकारकडून दहा लाख रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून कमिशन दाखल २० हजार रुपये घेऊन असंख्य महिलांची फसवणूक करून महिला आरोपी फरार झाली आहे.

मुद्रा योजनेनंतर्गत १० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून ५ लाखांची सबसिडी मिळवून देण्याचे आमिष दाखवत बहुसंख्य महिलांकडून प्रत्येकी २० हजार रुपये कमिशनदाखल घेऊन बेळगावमधील भाग्यश्री हुबळीकर नामक महिला फरार झाली आहे. याप्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अखेर फसगत झालेल्या महिलांनी मार्केट पोलिस स्टेशनची पायरी चढली आहे.

बेळगाव शहरातील समर्थ नगर येथे राहणाऱ्या भाग्यश्री हुबळीकर या महिलेने 50 हून अधिक महिलांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून सदर महिलेने कर्नाटक बँक लिमिटेड या खासगी बँकेचे नाव वापरून हे सर्व उपद्व्याप केल्याचे प्राथमिक माहितीनुसार उघड झाले आहे. याप्रकरणी विशाल कोकितकर, ज्योतिबा कोकितकर आणि बँकेच्या कॅशियर विरोधात देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याप्रकरणी फसगत झालेल्या लक्ष्मी तलवार नामक महिलेने सांगितले, कि भाग्यश्री हुबळीकर नामक महिलेने कर्ज देण्याचे आमिष दाखवून आपल्याकडून २० हजार रपये उकळले आहेत. यामध्ये आपली फसवणूक झाली असून भाग्यश्री हुबळीकर सध्या फरार असल्याचे या महिलेने सांगितले.

कर्नाटक बँकेत काम करत असल्याचे सांगत भागश्री हुबळीकर या महिलेने 25 हजारांहून अधिक रक्कम घेऊन आपली फसवणूक केल्याचे आफिया बशीर यांनी सांगितले असून, याप्रकरणी मार्केट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती या महिलेने दिली आहे. ()

Tags: