बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले की, भजन संपवून मंदिरात झोपलेल्या व्यक्तीचा खून झाल्याची घटना काल गोकाक तालुक्यातील ममदापूर येथे घडली. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे .
त्यांनी आज बेळगावात प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. गोकाक तालुक्यातील ममदापुर गावातील बीरसिद्धेश्वर मंदिरात भजन करून झोपलेल्या मद्देप्पा यल्लाप्पा बनसी (४७) यांच्यावर बीरप्पा सिद्धप्पा सुंधोली याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या मद्देप्पा यांना बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार कुचकामी ठरल्याने मद्देप्पाचा मृत्यू झाला. मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीचीही नोंद करण्यात आली असून आरोपी बिरप्पा सुंधोळी याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांमध्ये जमिनीच्या हद्दीवरून वाद असल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.


Recent Comments