चित्रदुर्ग येथील रेणुकास्वामी यांची अभिनेता दर्शन आणि टोळीने अमानुष छळ करून हत्या केल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केले असून या प्रकरणाशी संबंधित काही फोटो व्हायरल झाले आहेत.
रेणुकास्वामींना पट्टणगेरे शेडमध्ये छळ करून मारले गेल्याचे फोटो पोलिस अधिकाऱ्यांना मिळाले आहेत. एफएसएल टीमच्या हाती हे फोटो लागले असून याप्रकरणी 10 हून अधिक फोटो सापडल्याची माहिती आहे. मात्र रेणुकास्वामींवर अत्याचार होत असताना फोटो कुणी काढले? दर्शनला कुणी पाठवले याबद्दल देखील माहिती उपलब्ध झाली आहे.
पट्टणगेरे शेडमध्ये रेणुकास्वामींवर हल्ला केल्यानंतर ओरडण्याचा आवाज आला. यादरम्यान गेटबाहेर असलेला सुरक्षारक्षक आत आला. सुरक्षा रक्षकाने हा प्रकार पाहिला. त्यानंतर लगेचच त्याने विनयला फोन केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणात सुरक्षा रक्षक हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरला असून सदर फोटो विनयला पाठविण्यात आल्यानंतर ते फोटो दर्शन पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर दर्शन देखील शेडवर दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान दर्शनने खाली पडलेल्या रेणुकास्वामींना उचलून एखाद्या चित्रपटाप्रमाणे फेकण्यात आल्याचे सांगितले जात असून रेणुकास्वामींच्या पायावरदेखील मारहाण करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या प्रकरणातील आरोपी विनयच्या फोनमध्ये रेणुकास्वामीचे फोटो सापडले आहेत.


Recent Comments