Belagavi

बेळगावातल्या सर्वात उंच २५ फुट उंच श्री गणेश मूर्तीचा आगमन सोहळा जल्लोषात

Share

येळ्ळूर रोड अष्टविनायक नगर वडगाव येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पहिल्यांदाच मुंबईच्या धर्तीवर नेत्रदीपक आणि जल्लोषात आगमन सोहळ्याची मिरवणूक काढण्यात आली.

पहिल्यांदाच बेळगावमध्ये मुंबईच्या धर्तीवर आगमन सोहळ्यानिमित्त मिरवणूक काढण्यात आली. बेळगावमधील सर्वात उंच श्री गणेश मूर्तीचा आगमन सोहळा, मंडळाचे कार्यकर्ते, अबाल वृद्धांच्या उपस्थितीत जल्लोषात पार पडला. हि मूर्ती मूर्तिकार मनोहर पाटील यांनी साकारली असून वडगाव पिंपळकट्टा ते येळ्ळूर रोड वडगाव पर्यंत वज्रनाद ढोलताशा पथकाच्या वादनात आगमन सोहळा पार पडला.

Tags: