Belagavi

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेतकरी संघटनांचे निवेदन

Share

बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय कृषी संस्था आणि कर्नाटक शेतकरी संघटनेच्या वतीने ल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना देण्यात आले.

बेळगाव शेतकरी समाज जिल्हाध्यक्ष सिद्धगौडा मोदगी व कर्नाटक शेतकरी संघटनेच्या वतीने अतिवृष्टी, महापूर यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त पिके, शेतकरी, वनपरिक्षेत्रातील जनतेची झालेली गैरसोय खानापूर वनपरिक्षेत्रात निर्माण झालेल्या आरोग्यसंदर्भातील असुविधा याबाबत निवेदन सादर करण्यात आले. खानापूर भागातील नागरिकांना आरोग्यसंदर्भातील सोयीसुविधांची गोवा राज्यावर अवलंबून राहावे लागत आहे.वेळेवर उपचार न मिळाल्याने वृद्ध, गरोदर महिला, लहान मुलांना जीव गमवावे लागत आहेत. हि बाब लक्षात घेऊन या भागात प्राथमिक आरोग्य सेवा, मध्यवर्ती व उपआरोग्य केंद्रे तातडीने स्थापन करावीत. यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी शेतकरी समाज जिल्हाध्यक्ष सिध्दगौडा मोदगी, कर्नाटक शेतकरी संघटनेचे चुनप्पा पुजारी यांच्यासह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते.

Tags: