Vijayapura

बसवण बागेवाडी येथे विश्वगुरू बसवण्णा मूर्ती प्रतिष्ठापना

Share

बसव सैन्य ग्राम विभागाच्या वतीने विजयपूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी तालुक्यातील मसबिनाळ गावात संत बसवेश्वरांची मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

वाद्यवृंदांच्या गजरात मिरवणुकीचे आयॊजन करून अमाप उत्साहात मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. कुडल संगम पंचमसाली पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामी व मसबिनाळ गावचे श्री यांनी शहरातील मान्यवरांसह दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

बसवजय मृत्युंजय स्वामी यांनी बस्वेश्वरांच्याबद्दल विचार व्यक्त केले. यादरम्यान पावसाची रिमझिम सुरु होती. अशातच आपल्याला संत बसवेश्वरांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी होता आले, हे आपले भाग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भविष्यात राणी कित्तूर चन्नम्मा यांचेही स्मृतिशिल्प उभारण्याचा सल्ला त्यांनी दिला.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर श्री सिद्धराम स्वामीजी, शंकर गौडा बिरादार, आणि बसव सैन्य ग्राम विभागाचे राजू गौडा पाटील, चंद्रशेखर बैचबाळ, सोमशेखर काराजोळ, रवि कट्नल्ली रवी बैचबाळ, संतोष गच्छीनवार आदी उपस्थित होते.

Tags: