Belagavi

संस्कृत प्रतिभा पुरस्कार आणि सत्कार

Share

कर्नाटक राज्य हायस्कूल संस्कृत शिक्षक संघ, बेळगाव विभागाच्या वतीने एस. एस. एल.सी. परीक्षेत संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात 72 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. उद्योजक चैतन्य कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्कृतची जोपासना आणि जतन करण्याची गरज आहे. संस्कृत ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांना संस्कृतचा अभ्यास करण्यात रस आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी चैतन्य कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

राज्य हायस्कूल संस्कृत शिक्षक संघाचे नारायण भट्ट यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. यावेळी बोलताना ते म्हणाले, संस्कृत विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळविण्याची अधिक संधी देते. प्रत्येकाने संस्कृतचा अभ्यास केला पाहिजे. संगणकाला सर्वात जवळची भाषा संस्कृत असल्याचे त्यांनी सांगितले.

याच प्रसंगी निवृत्त शिक्षक चंद्रशेखर जोशी आणि सूर्यनारायण भट यांचा संस्कृतमधील प्रदीर्घ सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. चिदानंद पाटील यांनी प्रास्ताविकातून संस्कृतचा अभ्यास करणे गरजेचे आहे, असे सांगितले. टी. आर. भास्कर यांनी स्वागत केले. गीता सिंदगी यांनी परिचय करून दिला. रामचंद्र भट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर एम. ए. हिरेमठ यांनी आभार मानले.

Tags: