गोकाक तालुक्यातील ममदापुरा गावात रात्री पूजा करून मंदिरात झोपलेल्या एका व्यक्तीची हत्यारांनी वार केल्याची घटना घडली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील ममदापुरा गावात रात्री भजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर एका व्यक्तीचा ऊस कापण्याच्या शास्त्राच्या सहाय्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे.
ममदापुरा गावातील बीर सिद्धेश्वर मंदिर येथे भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भजनानंतर मड्डेप्पा यल्लाप्पा बानसी (47) हे मंदिराच्या समोर झोपले असता बिरप्पा सिद्धप्पा नामक व्यक्तीने येऊन त्यांच्या गळ्यावर कोयत्याने वार करून हल्ला केला. यात मड्डेप्पा गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या दोघांमध्ये मैदानाच्या हद्दीवरून वाद झाल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली असून याप्रकरणी गोकाक ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments