Belagavi

अंमली पदार्थांवर निर्बंध घालावेत : नम्म कर्नाटक सेनेची मागणी

Share

राज्यात अंमली पदार्थांवर बंदी घालावी या मागणीसाठी बेळगावमधील नम्म कर्नाटक सेनेतर्फे आंदोलन करण्यात आले.

अंमली पदार्थांमुळे तरुणांचे नुकसान होत आहे. अंमली पदार्थांच्या व्यसनाला बळी पडणे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. यामुळे राज्यात अमली पदार्थांवर बंदी घालावी, अशी मागणी नम्म कर्नाटक सेनेतर्फे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना गंगाधर दोड्मणी म्हणाले की, गांजा, अफू यासारखे अमली पदार्थ युवा पिढीला उद्ध्वस्त करत आहेत, अंमली पदार्थामुळे जीवनाची हानी होण्याबरोबरच समाजाचे आरोग्यही बिघडत आहे. हि बाब लक्षात घेऊन अमली पदार्थांवर बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली.

या आंदोलनात नम्म कर्नाटक सेनेचे जिल्हाध्यक्ष इरफान अत्तार, प्रदेश उपाध्यक्ष बसवराज शेगावी जिल्हा पदाधिकारी गंगाधर दोडमणी, संतोष कल्लेकनवर, सुधीर संभाजी, प्रकाश मागेरी, विश्वनाथ डी, श्रीनाथ आदी उपस्थित होते.

Tags: