बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर येथील खासगी एपीएमसी बंद करण्याच्या मागणीसाठी राज्य व हरित शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले.
बेळगावच्या चेन्नम्मा सर्कलमध्ये हरित आणि राज्य शेतकरी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. पिकांचे नुकसान, पीक विमा भरपाई वाटपात दिरंगाई आणि हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर शहरातील खाजगी एपीएमसी बंद करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

शेतकरी नेते चुनाप्पा पुजारी म्हणाले की, पावसाने झालेल्या नुकसानीची आणि दुष्काळाची भरपाई कोणत्याही सरकारने दिली नाही, हुक्केरी तालुक्यातील संकेश्वर येथील खासगी एपीएमसीमध्ये दलालांचा त्रास वाढला आहे, दलालांना वर्षाला 10 कोटींचे उत्पन्न मिळत आहे, संकेश्वर शहरातील खाजगी एपीएमसी बंद करावी अशी सरकारकडे मागणी केली आहे.
या आंदोलनाला हरित आणि राज्य शेतकरी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते


Recent Comments