देशातील वंचितांना शिक्षण आणि आरोग्य सेवेत मदत करण्याच्या उद्देशाने बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या नेतृत्वाखाली सुरू केलेले बीइंग ह्युमन हे ब्रँडेड कपड्यांचे दुकान बेळगावात झाले असून काल रात्री अभिनेता सोहिल खान याने नवीन स्टोअरचे उद्घाटन केले.
राज्याची दुसरी राजधानी स्मार्ट सिटी बेळगाव मध्ये , स्मार्ट लूक देण्यासाठी प्रसिद्ध बीइंग ह्युमनचे आगमन झाले आहे. सणासुदीच्या सुरुवातीलाच बीइंग ह्युमनने बेळगावात आपले दुकान उघडले आणि कुंदानगरीतील लोकांच्या आनंदात भर पडली. रविवारी सायंकाळी बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, केएलई संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, ॲड.ए.जी. कुलकर्णी, प्रियांका कुलकर्णी, अभिषेक कुलकर्णी इतर मान्यवर बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा भाऊ अभिनेता सोहेल खान यांनी बीइंग ह्युमनच्या नवीन स्टोअरचे उदघाटन केले.

बीइंग ह्युमनचे कपडे देश-विदेशात लोकप्रिय आहेत. थोडे महाग असले तरी बीइंग ह्युमन लूक , परिधान करणाऱ्यांसाठी अप्रतिम आहे. 15 फॅशनप्रेमी देशांमध्ये आपली पोहोच वाढवल्यानंतर बीइंग ह्युमन बेळगावात दाखल झाले आहे, ही बेळगाव आणि सलमानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

बीइंग ह्युमन ग्राहकांना एक अनोखा अनुभव देते. त्याची सुरुवात प्रेम काळजी वाटून मदत आणि आनंद या मंत्राने झाली. वस्त्र उत्पादकांच्या मूल्यांचा आदर करत शिक्षण आणि आरोग्य सेवेतील भारतातील वंचित लोकांपर्यंत पोहोचण्याचे ‘बीइंग ह्युमन’चे उद्दिष्ट आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिनेता सोहिल खानने सांगितले कि , बेळगावला बीइंग ह्युमनची ओळख करून देण्यास थोडा उशीर केला. मात्र, जागतिक स्तरावर कौतुक झालेले बीइंग ह्युमन कपडे बेळगावकरांना नक्कीच आवडतील. बीइंग ह्युमन बेळगावच्या फॅशनप्रेमींच्या उत्साहात भर घालणार आहे. ते म्हणाले की, फॅशन प्रेमींना कपडे पुरवून आणि धर्मादाय संस्थांना निधी देऊन वंचितांना शिक्षण आणि आरोग्य सेवेसाठी मदत करते. त्यांनीबेळगावकरांना बीइंग ह्युमनचे कपडे परिधान करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी, विवेक संधवार, प्रीती चोप्रा, उत्सा रॉय यांच्यासह बीइंग ह्युमनचे ग्राहक पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments