Belagavi

बेळगावच्या “राजा ” चे धुमधडाक्यात आगमन

Share

बेळगावचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या चव्हाट गल्ली येथील श्रीगणेशाचे आगमन काल रात्री अत्यंत उत्साही आणि जल्लोषी वातावरणात झाले.

बेळगावच्या राजाचे पहिले दर्शन घेण्यासाठी रविवारी रात्री शहरातील छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज सर्कलमध्ये , हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सुमारे पाच ढोलताशा पथके , शिवशंभू, झुंज, ब्रह्मनाथ, धाडस आणि वज्रनाथ ढोल ही पथके या मिरवणुकीत सहभागी झाली होती . सुमारे 250 ढोल, 75 ताशा आणि 50 झेंडे यांनी मिरवणुकीत जल्लोष केला.

माजी आमदार अनील बेनके, नगरसेविका वैशाली कडोलकर, मराठा बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार, राजू कडोलकर, विकास कलघटगी, श्री गणेशोत्सव महामंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रोहित रावल, अनिल पावशे, मंडळ अध्यक्ष श्रीनाथ पवार, कार्याध्यक्ष सुनिल जाधव, आनंद आपटेकर , राजू कडोलकरआदी उपस्थित होते.

बेळगावातील राजा चव्हाट गल्लीतील गणपतीचे आगमन झाले असून, त्यांनी बेळगावकरांना गजाननाचे पहिले दर्शन दिले. चतुर्थीच्या दिवसापासून त्यांचे दर्शन घेण्याचे आवाहन केले देशात मुंबई, महाराष्ट्रानंतर बेळगावात श्रीगणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. आज बेळगावचा राजा चव्हाट गल्लीच्या श्रीगणेशाचे आगमन होत असून त्यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

बेळगावात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि पुण्यानंतर बेळगावात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मराठा बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार यांनी बेळगाववासीयांनी भक्तीभावाने गणेशाची कृपा प्राप्त करावी, असे आवाहन केले. (बाइट)
सुनिला जाधव यांनीही गणेशोत्सवाची माहिती दिली.

छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज सर्कल येथून निघालेली ही मिरवणूक कॉलेजरोड, राणी चेन्नम्मा सर्कल, कोर्ट मार्ग मार्गे चव्हाटगल्ली येथे संपली.

Tags: