विजयपुर शहरात नुकत्याच झालेल्या चोरीच्या घटनांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अधिकारी, कर्मचारी आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले तपास पथक तयार करण्यात आले. तपास पथकाने एका आरोपीला अटक केली आहे. अशी माहिती विजयपूरचे एसपी हृषिकेश सोनावणे यांनी दिली .
त्यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शोधपथकाकडून शेजारच्या महाराष्ट्रातील सांगली, पुणे आणि शेजारील बागलकोट, बेळगाव या जिल्ह्यांमध्ये सर्वत्र तपास करण्यात आला. अशपाक उर्फ अशोक सैवसाब जटगार याला अटक करण्यात आली असून त्याने विजयपूर शहरात 03 घरफोड्या केल्याचे कबुल केले आहे . आरोपींकडून 03 गुन्ह्यांशी संबंधित 362.5 ग्रॅम. सोन्याचे दागिने आणि 300 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 26,82,500/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .


Recent Comments