सर्व गोष्टींचा अधिपती असलेल्या श्री गणेशाचे अनेक भक्त आहेत. ते अनेक प्रकारे गणेशाची पूजा करतात. बेळगावातील एक मुलगी आपल्या कलेद्वारे श्री गणेशाची पूजा करून गणेशोत्सवाचा आनंद गरीब आणि मध्यमवर्गीयांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे. याविषयीचा हा अहवाल
श्री गणपती हि बुद्धीची देवता म्हणून पुजली जाते. चौदा विद्यांचा अधिपती असणारा श्री गणपती याची आराधना प्रत्येकजण आपापल्या परीने करतो. कधी मनातले हितगुज तर कधी आपले लाडके आराध्य अशा विविध पद्धतीने प्रत्येकजण गणपतीची पूजा करतो.
शिकलेली कला कधी आणि कुठे उपयोगी पडेल हे सांगता येत नसले तरी कलेमध्ये देव पाहण्याची आणि समाजासाठी योगदान देण्याची वृत्ती असेल तर शिकलेल्या कलेची उपयुक्तता लक्षात येते. मात्र आपण शिकलेल्या कलेचा योग्य वापर करून, अर्थार्जन आणि कला या दोन्ही उद्देशातून ढोर गल्ली वडगाव येथील नम्रता श्रेयकर या तरुणीने आकर्षक अशा गणेशमूर्ती साकारून आपल्या शिक्षणाचा, कलेचा आणि आई – वडिलांच्या संस्कारांचा गौरव केला आहे.

ढोर गल्ली, वडगाव येथे राहणाऱ्या नम्रता श्रेयकर या तरुणीने फाईन आर्ट या क्षेत्रात डिप्लोमा पूर्ण केला असून ‘सुखकर्ता कला केंद्र’ या नावे सदर तरुणीचे फेसबुक पेज आहे.गणेशोत्सवादरम्यान राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावमध्ये गणेशभक्तांना विशेषत: गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्या बजेटमध्ये गणेशमूर्ती मिळणे थोडे कठीण जाऊ शकते. त्यामुळे नम्रता श्रेयकरने शिकलेल्या कलेचा वापर करून ५० हून अधिक आकर्षक गणेशमूर्ती बनवल्या आहेत. या आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. नम्रता म्हणाल्या की, कलेचा वापर करून अत्यंत कमी खर्चात गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नम्रताच्या या प्रयत्नांना तिचे आई-वडील आणि कुटुंबीयांकडून पाठिंबा मिळत असून, नम्रताच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे


Recent Comments