सुमारे ४० वर्षे शिक्षिका म्हणून सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या बेळगाव तालुक्यातील मुतगा शासकीय उच्च प्राथमिक शाळेच्या शिक्षिका अंजुदेवी केदनुरकर यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.
शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात डीडीपीआय लीलावती हिरेमठ उपस्थित होत्या. निवृत्त शिक्षिका अंजुदेवी केदनुरकर यांच्यासह एसडीएमसी सदस्य व्यासपीठावर होते. शिक्षिका अंजुदेवी केदनुरकर यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना डीडीपीआय लीलावती हिरेमठ म्हणाल्या की, शिक्षिका अंजुदेवी केदनुरकर या नेहमी मधमाशीच्या पोळ्यातील मधमाश्याप्रमाणे आपल्या कर्तव्यात तल्लीन होत्या. ग्रामीण भागातील शिक्षक मुलांना शिकवण्यासाठी नेहमीच परिश्रम घेतात. ही गोष्ट आमच्या विभागाला अभिमानास्पद आहे, असे त्या म्हणाल्या निवृत्त शिक्षिका अंजुदेवी केदनुरकर यांनी सर्वांचे आभार मानले आणि शिक्षकांना पारदर्शकतेने सेवा देता येईल असे वातावरण निर्माण केले पाहिजे असे त्या म्हणाल्या .

यावेळी एस.जी. करंबळकर, उमेश पुरी, नारायण कनबरकर, कृष्णा पाटील, प्रभाकर तलवार, मुख्याध्यापक ए.ए. पाटील, ग्रा.पं. सदस्य किरण पाटील, भालचंद्र पाटील आणि विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments