ARREST

चक्रवाढ व्याजाने पैसे देणाऱ्यांवर कारवाई : एकाच दिवसात 23 जणांना अटक.

Share

हुबळी धारवाड येथे खाजगी सावकारी धंद्याला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कडक कारवाई केली असून हुबळी धारवाडच्या विविध पोलिस ठाण्यात एक कार, 2 दुचाकी, कोरे धनादेश व बॉण्डसह 23 जणांवर 13 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या आठवडाभरापासून खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून एका महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून तिच्यावर किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत केशवापूर पोलीस ठाण्यांतर्गत बेनगेरी येथील चेतना कॉलनीत व्याजी पैसे देणाऱ्या सावकाराच्या छळाला कंटाळून , एका व्यक्तीने छळ करणाऱ्याचे नाव लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे .

अशा प्रकारे शहरातील ह्या पैशाचा छळवणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्पाप लोकांचे रक्त शोषणाऱ्या या व्यावसायिकांविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येणार असून, व्याजी पैसे घेतलेल्या आणि त्रासाला कंटाळलेल्यांनी लाज न बाळगता पोलिस ठाण्यात तक्रार करावी असे आवाहन केले , विद्यानगर, धारवाड उपनगर, कामरीपेठ, जुनी हुबळीसह विविध पोलिस ठाण्यात 16 गुन्हे दाखल आहेत.

कर्जाच्या स्वरूपात दिलेल्या एक लाखाचे , चक्रवाढ व्याज जोडून 4 ते 5 लाख जमा करणाऱ्यांवर आयुक्त एन शशिकुमार यांनी योग्य ती कारवाई केली आहे.

Tags: