गणेशोत्सव व ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बेळगाव पोलीस विभागातर्फे आज पथसंचलन करण्यात आले .
बेळगावात श्री गणेशोत्सव आणि ईद-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बेळगाव पोलिसांनी आतापासूनच प्राथमिक तयारी केली आहे. आज बेळगाव पोलिसांनी डीसीपी रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च काढला. शहरातील राणी चेन्नम्मा सर्कल येथून पथसंचलनाला सुरुवात झाली , काकतीवेस, शनिवार खुट, खडेबाजार, किर्लोस्कर रोड मार्गे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथे पथसंचालनाची सांगता करण्यात आली . संवेदनशील आणि अतिसंवेदनशील ठिकाणी मार्गक्रमण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना बेळगाव पोलिसांनी कडक इशारा दिला आहे.

यावेळी एसीपी व इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.


Recent Comments