Belagavi

ओमानमध्ये भीषण अपघात : बेळगाव येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू

Share

दुबई येथे ओमानच्या सहलीला गेलेल्या बेळगाव येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला.  बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील एक कुटुंब ओमानला सहलीसाठी गेले होते. रस्ता अपघातात या चारही जणांचा मृत्यू झाला.

गोकाक येथील विजया तहसीलदार, पूजा, पवन कुमार आणि आदिश अशी मृतांची नावे आहेत. दुबईच्या हैमा परिसरात एक कार आणि एक लॉरी यांची समोरासमोर धडक झाली . आणि कारने पेट घेतला . ह्या कारमधून हे गोकाकचें कुटुंब प्रवास करत होते . कारला लागलेल्या आगीत , हे चारही जण जिवंत जळाल्याची माहिती आहे.

राज्यसभा सदस्य इरान्ना काडाडी यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि मंत्री प्रल्हाद जोशी यांना मृतदेह भारतात आणण्याची व्यवस्था करण्याची विनंती करण्यात आली आहे.

Tags: