Gadag

बेपत्ता महिला सापडली विहिरीत : महिलेची कहाणी ऐकून बसला स्थानिकांना धक्का

Share

गदग येथील तोटगंटी गावात तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेली विवाहिता विहिरीत सापडली आहे. अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेली ही महिला 20 ऑगस्टच्या पहाटे घराच्या अंगणात काम करत होती. यावेळी एका अज्ञात महिलेने अचानक घरात घुसून या महिलेच्या गळ्याला पकडून तिला घराबाहेर पडण्यास भाग पाडले.

तुला सोने-चांदी हवी असेल तर मी तुला देते पण मला सोड असे या विवाहितेने त्या अनोळखी स्त्री ला सांगतले . पण मला याची काहीही गरज नाही, मला तू हवी आहेस.. घर सोडून ये. त्यानंतर त्या अनोळखी महिलेने , तिला मक्याच्या शेतातून ओढत नेले . तुझे मंगळसूत्र दे नाहीतर तुला विहिरीत टाकीन अशी धमकी दिली . नंतर तिला त्या विहिरीत टाकून गायब झाल्याचे पीडितेने सांगितले

ही महिला विहिरीत पडताच तिची शुद्ध गेली . आणि दुसऱ्या दिवशी शुद्ध आल्यावर ती विहिरीत पडल्याचे लक्षात येताच तिने मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र हा निर्जन भाग असल्याने तिचे ओरडणे कोणालाच ऐकू न आल्याने तिला तीन दिवस विहिरीत राहावे लागले.

या घटनेनंतर दोन दिवसांनी महिलेचा आवाज ऐकून स्थानिक लोक विहिरीजवळ आले असता महिला विहिरीत असल्याचे समजले. स्थानिकांनी तिला बाहेर काढून तिचा जीव वाचवला . त्यानंतर तिला गदगच्या जिम्स रुग्णालयात दाखल केले. अज्ञात महिलेने विवाहितेची अपहरण करून तिला विहिरीत ढकलून दिले .विहिरीत पडून , ३ दिवसानंतर देखील ती विवाहिता वाचली हा चमत्कारच म्हणावा लागेल . या प्रकरणी गावात उलटसुलट चर्चा सुरु आहे .

Tags: