Belagavi

मोदगा ग्रा. पं . च्या नूतन इमारतीचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते उद्घाटन

Share

मोदगा ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मनातरी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले  बेळगाव तालुक्यातील मोदगा ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व राजीव गांधी सेवा केंद्र व संजीवनी सेवा केंद्राचे उद्घाटन पार पडले.

हुनशीकट्टी होनिहाल हिरे मठाचे आदरणीय श्री श्री बसवराज देवरु आणि हुक्केरी क्यारगुड्ड इंचगेरी मठाचे आदरणीय श्रीमद अभिनव मंजुनाथ महास्वामी यांच्या दिव्य उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला .

यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या कि, महात्मा गांधीजी म्हणायचे की भारत हा खेड्यांचा देश आहे, खेडी सुधारली तर देश सुधारतो आणि खेड्यातील शेतकरी सुधारला तर देशाचा विकास होतो. महात्मा गांधींच्या संकल्पनेतून गावांच्या विकासासाठी झटत आहे. , मी कधीच गावांच्या विकासाचे राजकारण केले नाही. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी ग्रामपंचायतींवरही महिलांची सत्ता असावी या दृष्टिकोनातून महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू केले. मी दिल्लीत एक रुपया सोडला तर तो थेट ग्रामपंचायतीकडे जावा, ही राजीव गांधींची संकल्पना होती. , देशातील ग्रामपंचायतींच्या सुधारणेत राजीव गांधी यांचे योगदान मोठे आहे. असे त्या म्हणाल्या .

विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की, , मोदगा येथे ग्रामपंचायतीची नवीन इमारत व सेवा केंद्र सुरू झाले ही आनंदाची बाब आहे. सर्वांच्या मेहनतीने हे स्वप्न आता साकार झाले आहे. कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्षा रेखा कटबुगोळ , उपाध्यक्षा विजयालक्ष्मी तळवार, पंचायत विकास अधिकारी प्रशांत मुनवल्ली, कार्यकारी अधिकारी रमेश हेडगे, मोदगा ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व व्यवस्थापन मंडळ उपस्थित होते.

Tags: