सदाशिवनगर, बेळगाव येथील गौरी महिला मंडळातर्फे श्री कृष्ण जन्माष्टमी व लक्ष्मीपूजन व तसेच कुंकुमार्चन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त श्री कृष्णाची विशेष पूजा आणि श्रावण महिन्याच्या निमित्ताने श्री महालक्ष्मी पूजन करण्यात आले. महिला मंडळाच्या या उपक्रमाबद्दल स्नेहल काळभैरव यांनी इन न्यूजला अधिक माहिती देताना सांगितले की, महिला मंडळातर्फे दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी अध्यक्षा जयश्री कराडकर, उपाध्यक्षा प्रेमा एत्तिनमनी, सचिव सुजाता गोकाक यांच्यासह महिला मंडळाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Recent Comments