बेळगावमधील अरिहंत हॉस्पिटलच्यावतीने गुरुवार दि. २९ ऑगस्ट रोजी मोफत मूत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अरिहंत हॉस्पिटलमध्ये गुरुवारी सकाळी 10 ते दुपारी 1 यावेळेत युरोलोजीस्ट डॉ. अमित मुंगरवाडी यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांची तपासणी करून मोफत सल्ला व सवलतीच्या दरात चाचण्या करण्यात येणार आहेत. मूत्राशयाच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये मुतखडा, मूत्राशयातील ट्युमर, प्रोस्टेटची समस्या, पुरुष वंध्यत्व, हर्निया, मूत्राशयातील समस्या, लहान मुलांच्या मूत्राशयातील समस्या, वेदनारहित मूत्र विसर्जन आदी रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 0831-2441199 अथवा 9036102390 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments