Belagavi

शून्य फार्म रिट्रीट रिसॉर्टमध्ये शास्त्रीय हिंदुस्थानी स्पर्धेचे आयॊजन

Share

बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील शून्य फार्म रिट्रीट रिसॉर्टमध्ये डॉ. ए.जी. तेंडुलकर यांच्या स्मरणार्थ 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता मेघ मल्हारम शास्त्रीय हिंदुस्थानी संगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे रिसॉर्टच्या संचालिका भक्तिवेदा तरागे यांनी सांगितले.

बुधवारी बेळगाव मध्ये आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या स्पर्धेत बेळगाव, गोकाक, धारवाड उत्तर कर्नाटकसह शेजारील महाराष्ट्र आणि गोव्यातील हिंदुस्थानी संगीत गायक सहभागी होणार आहेत. संगीत स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

ग्रामीण भागातील कलागुणांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मैफलीचा लाभ बेळगावातील जनतेने घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास प्रसिद्ध हिंदी गायक रूपकुमार राठोड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग यांचीही उपस्थिती असेल. याचप्रमाणे शास्त्रीय संगीतात निपुण असणाऱ्या अनेक कलाकारांचीही यावेळी उपस्थिती असेल.

या संदर्भात अधिक माहिती देताना डॉ. यदेंद्र पुजारी म्हणाले की, बेळगावात अनेक शास्त्रीय संगीतकार आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला इम्रान मकानदार, रेमे रामदास आदी उपस्थित होते.

Tags: