कुडची नगर परिषदेच्या दुसऱ्या कालावधी साठी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी हमिदोदीन रोहिले यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
आज सोमवारी नगर परिषदेच्या कार्यालयात निवडणूक घेण्यात आली . सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रिया प्रारंभ झाली . नगराध्यक्षपद सामान्यवर्गासाठी राखीव होते . त्या करिता काँग्रेस पक्षाचे हमिदोदीन सैदोद्दीन रोहिले यांनी आमदार महेंद्र तम्मण्णावर यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर उपनगराध्यक्ष पदासाठी एस टी आरक्षण होते. काँग्रेस कडे उमेदवार नसल्याने भाजपचे शिवापा गस्ती यांनी आपल्या सहकाऱ्यांसह येऊन उमेदवारी अर्ज भरला . प्रत्येकी एकेकच उमेदवारी अर्ज दाखल आला होता .
दुपारी एक वाजता निवडणूक अधिकारी सुरेश मुंजे यांनी दोन्ही पदाकरीता एक एक नामांकन दाखल झाल्याने दोन्ही निवडी बिनविरोध जाहीर केल्या त्यानंतर आमदारांचा हस्ते दोघांचे सत्कार करण्यात आले यावेळी बोलताना नूतन नगराध्यक्ष रोहिले यांनी आमदार महेंद्र तम्मण्णावर यांच्या नेतृत्वात सर्व २३ वार्डातील सदस्यांना विश्वासात घेऊन कुडचीचा विकास करण्याचा संकल्प व्यक्त करत सर्वांचे आभार मानले . यावेळी बोलताना आमदार महेंद्र तम्मण्णावर यांनी बोलताना कुडचीचा विकासाकरिता सरकारकडून विशेष अनुदान आणून पक्षभेद विसरून सर्व वार्डातील विकास कामांना प्राधान्य देण्याचा भरवसा देत , सदैव आपण आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार सुरेश मुंजे उप तहसिलदार अभिषेक बोंगाळे , मुख्याधिकारी बी एम माने उपस्थित होते
निवडीनंतर समर्थकांनी गुलाल उधळून फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला कुडचीचे उपनिरिक्षक प्रीतम नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह चोख बंदोबस्त ठेवला होता
Recent Comments