कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या 200 व्या विजयोत्सवानिमित्त बेळगाव विमानतळाला कित्तूर राणी चन्नम्मा विमानतळ असे नाव देण्यात यावे, असे कन्नड समर्थक श्रीनिवास ताळूकर यांनी सांगितले.
सर्वोदय स्वयं सेवा संघटना आणि बेळगावमधील कन्नड समर्थक संघटना यांनी बेळगाव सूर्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांकडेउपरोक्त मागणी केली आहे.
१८२४ साली ब्रिटिशांविरोधात लढून विजयी झालेल्या कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या विजयोत्सवाचे आचरण म्हणून यंदा सरकारच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत बेळगावच्या विमानतळाला कित्तूर राणी चन्नम्मा यांचे नाव देऊन नामकरण करण्यात यावे, तसेच त्यांच्या स्मरणार्थ नाणी आणि टपाल तिकीट जारी करण्यात यावे, अशी मागणी कन्नड समर्थक संघटनेचे श्रीनिवास ताळूकर यांनी केली.
यावेळी श्रीनिवास ताळूकर, आनंद लोकारी, मल्लाप्पा सोंटळी, प्रकाश शिरोळकर यांच्यासह कन्नड समर्थक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments