पराप्पा कारागृहात अभिनेता दर्शनला शाही वागणूक मिळत असल्याची माहिती समोर आली असून कारागृहात घडलेल्या घटनेची दखल गांभीर्याने घेत या प्रकारासंदर्भात ७ जण निलंबित करण्यात आले आहेत. याप्रकरणी चौकशी केली जाईल अशी माहिती मुख्यामंत्री सिध्दरामय्यांनी दिली.
गोकाक, मूडलगी आदी ठिकाणी आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बेळगाव दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी रेणुका स्वामी खून खटल्यात तुरुंगात असलेल्या अभिनेते दर्शनला मिळालेल्या शाही आदरातिथ्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. दर्शनला मिळणाऱ्या शाही वागणुकीची चौकशी केली जाईल शिवाय कारागृह बदलण्याची कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. कारागृहाला भेट देऊन या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल देण्याच्या सूचना आपण राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अभिनेता दर्शनला कारागृहात मिळणाऱ्या आदरातिथ्याचा माहितीनंतर गृहमंत्री कारागृहात भेट देणार असून अभिनेता दर्शन आणि इतर काहींना विविध कारागृहात हलविण्यासंदर्भात अहवाल सादर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाबाबत जिल्ह्यातील सर्व आमदारांशी चर्चा करणार आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग तथा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू सेठ, बाबासाहेब पाटील, महांतेश कौजलगी, बेळगावीजिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष विनय नवलगट्टी, बेळगाव बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments