Belagavi

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगावात श्रीकृष्ण जन्माष्टमी मिरवणुकीचा केला शुभारंभ

Share

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगावात ढोल वाजवून श्रीकृष्ण रथोत्सव मिरवणुकीला सुरुवात केली. बेळगाव जिल्हा प्रशासन , जिल्हा पंचायत , महानगर पालिका , , जिल्हा पंचायत, कन्नड व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रमात सहभागी झालेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व ढोल वाजवून श्रीकृष्णाच्या रथोत्सवाची मिरवणूक सुरू झाली.

यावेळी विधानपरिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी , युवक काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर, कन्नड संस्कृती विभागाच्या उपसंचालक विद्यावती भजंत्री, रमेश हुक्केरी, बाळकृष्ण पाटील, बसवराज मोदगेकर, पी.एल.पाटील, महानगर पालिका सदस्य एन.एन.पाटील, शिवलिंग पुजारी, शीतल मुंढे , शास्त्री , आनंद चौगला , जयगौडा पाटील , वाय वाय पाटील , विठ्ठल पाटील , वाय वाय गडकरी आदी उपस्थित होते.

Tags: