राज्यस्तरावर होणाऱ्या कराटे स्पर्धेसाठी बेळगावच्या जिल्हास्तरावरील कराटेपटूंची निवड प्रक्रिया आज पार पडली.
बेळगावात बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे असोसिएशनतर्फे 14 वर्षांखालील जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्ह्य़ातील विविध भागातील कराटेपटूंनी सहभागी घेऊन उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कराटेपटूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
यामध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून 14 वर्षांखालील दोनशेहून अधिक कराटे खेळाडू सहभागी झाले होते. याबाबत बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांनी इन न्यूजला अधिक माहिती दिली. ते म्हणाले की, बेळगावातील कलागुणांना वाव मिळावा, यासाठी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी बेळगावच्या कराटेपटूंची निवड प्रक्रिया गेल्या 9 वर्षांपासून सुरू आहे.

बेळगाव जिल्हा स्पोर्ट कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर तसेच सचिव जितेंद्र काकतीकर यांच्या हस्ते जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात येत आहे. येथे निवड झालेल्यांची बेंगळुरू येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागातील कराटेपटू सहभागी झाले होते.


Recent Comments