राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने बेळगावात , मराठा समाजाचा वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला होता .
व्हॉइस ओव्हर बेळगावमधील रामनाथ मंगल कार्यालयात राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने ,वधुवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
गविपूर, गोसाई मठ, बंगळुरूचे श्री जगद्गुरू वेदांताचार्य मंजुनाथ स्वामीजी आणि काद्रोलीमठ बैलहोंगलचे श्री गुरुपुत्रय्या स्वामीजी यांनी उपस्थित राहून आशीर्वाद दिले. स्वामीजींनी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ.सोनाली सरनोबत म्हणाल्या की, मराठा समाजाने स्वत:च्या हितासाठी संघटित होऊन समाजाला बळ देण्याची गरज आहे, जिजाऊ ब्रिगेड समाजातील सर्व महिलांच्या पाठीशी सर्व अडचणींना सामोरे जाईल, असे त्या म्हणाल्या .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली माळकरी, गीतांजली चौघुले, नम्रता हुंदरे, कांचन चौघुले, आशाराणी निंबाळकर, वृषाली मोरे, लक्ष्मी गौंडाडकर विद्या सरनोबत, चंद्रा चोपडे यांनी केले.
कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे सदस्य दिलीप पवार, सतीश बाचीकर, रोहन कदम, डी.बी.पाटील, संजय भोसले आदींचा सहभाग होता.


Recent Comments